CART: $0.00
This event has sold out, no tickets are currently available.

अभंगरंग (SOLD OUT)

Date
Location
Bracken Ridge Hall 77 Bracken Street, Bracken Ridge, QLD, 4017

About

अभंगरंग - भक्ती आणि भावाचा एक अपूर्व सोहळा!

ब्रिस्बेनच्या सांस्कृतिक क्षेत्रात प्रथमच आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर आयोजित होत आहे एक विशेष कार्यक्रम - 'अभंगरंग'. टाळ-लेझीमच्या तालावर माऊलींची पालखी नाचवीत विठ्ठलाच्या चरणी स्वराभिषेक करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत अभंगांची एक सुश्राव्य मैफल. भारतापासून दूर असूनही भक्तीचा ओलावा, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान आपण ब्रिस्बेनमध्ये आषाढी एकादशी २०२६ला एकत्र अनुभवुया. अडीच तासांच्या या कार्यक्रमात आपण असे काही निवडक आणि सुप्रसिद्ध अभंग ऐकूयात. स्थानिक कलाकारांद्वारे टाळ-मृदूंग, तबला-चिपळ्या तसंच बासरी, व्हायोलिन या वाद्यांची साथसंगत हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल.

आमचे कलाकार: या भक्तीमय प्रवासात आपल्याला साथ देणार आहेत ब्रिस्बेनचे स्थानिक कलाकार,
गायन: ऋग्वेद आणि रघुनाथ
तबला: पंकज नावलेकर
पखवाज/मृदंग: चिन्मय पळणिटकर
व्हायोलिन: डॉ. अशोक मालूर
बासरी: अक्षय कलावर
तालवाद्य: नाम्या आणि ईरा

मराठी आणि अमराठी अशा सर्व विठ्ठभक्तांनी या सुरेल अनुभवाचा आनंद घेण्यासाठी आजच आपले तिकीट आरक्षित करा!

चला, विठुनामाच्या गजरात दंग होऊया!
Please don’t forget to book your Ekadashi Faral ($12/pp) with Mrs Saroj Kramavant @ 0422427481.
Last Date for ordering food is 23/07/2026.